Posts

16 सप्टेंबरपासून मतदारयाद्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम यवतमाळ, दि. 14 : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2017 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांसाठी दि. 1 जानेवारी 2017या पात्रता दिनांकावर आधारीत विधानसभेची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा मतदारयाद्यांचे पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. दि. 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या पात्र नागरीकाने या कालावधीत मतदारयादीत नाव नोंदविले तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेममध्ये मतदान करता येणार आहे. नवीन नाव नोंदविण्याबरोबरच नावामध्ये दुरूस्ती, दुबार किंवा मयत व्यक्तीचे नाव वगळणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी मतदारयादीमध्ये आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 00000
महात्मा फुले महामंडळातर्फे कर्जाचे फॉर्म वितरण यवतमाळ, दि. 14 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयातर्फे तालुकास्तरावर कर्जाच्या फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे. अनूसचित जातीमधील बौद्ध, महार, खाटीक, मेहतर या समाजाती एक लाख रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गरजू लाभार्थींना फॉर्मचे वितरण करण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर रोजी घाटंजी, 16 सप्टेंबर नेर, 22 सप्टेंबर दारव्हा, 23 सप्टेंबर रोजी आर्णी येथील पंचायत समितींमध्ये कार्यालयीन वेळेत हे फॉर्म वाटप करण्यात येणार असून कर्जाबाबत माहिती, कर्ज प्रकरणे गोळा करणे आदी माहितीसाठी महात्मा फुले महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 00000
शेतकरी कुटुंबांना मिळाली अन्नसुरक्षा *88 हजार शिधापत्रिकाधारक *चार लाख शेतकरी लाभार्थी *23 लाख नागरीकांना धान्य यवतमाळ, दि. 14 : सततच्या नापिकी आणि अडचणीत आलेल्या राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अन्नसुरक्षेचा लाभ देण्यात येत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 88 हजार शिधापत्रिकाधारक चार लाख शेतकऱ्यांना या अन्नसुरक्षेचा लाभ मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे. या अडचणीतील शेतकऱ्यांनी गंभीर पाऊल उचलू नये, यासाठी शेतकऱ्यांना दोन रूपये किलो दराने गहू आणि तीन रूपये किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, एपीएल शेतकरी कुटुंब या शिधापत्रिकाधारकांना स्वस्तात धान्य योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत 90 टक्के नागरीकांना स्वस्तात धान्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील 26 लाख 96 हजार 512 नागरीकांपैकी विविध योजनेतून पात्र 23 लाख 62 हजार 409 नागरिकांना अन्न सुरक्षेची हमी मिळाली आहे. जिल्ह्यातील 5 लाख 69 हजार 956 शिधापत्रिकाधारक...
शेतकऱ्यांना मिळाला शाश्वत सिंचनाचा आधार *नऊ हजार विहिरी पुर्ण *धडकमधून साडेआठ हजार विहिरी *सिंचनामुळे रब्बी पिके वाढणार यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या कारणांपैकी एक शाश्वत सिंचनाची व्यवस्था नसणे हे एक आहे. यावर उपाययोजना म्हणून पंतप्रधान पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत पुर्ण करण्यात आलेल्या 9 हजार 247 विहिरींपैकी  8 हजार 593 विहिरी धडक सिंचन, तर 654 विहिरी नरेगामधून पूर्ण करण्यात आल्या आहे. धडक सिंचन विहिरी आणि नरेगात वर्ग झालेल्या विहिरींची संख्या मोठी आहे. विहिरीमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 20 हजार 800 विहिरींचे लक्षांक देण्यात आले आहे. या योजनेतून 14 हजार 845 विहिरी मंजूर करण्यात आल्या आहे. यातील 7 हजार 164 विहिरी पुर्ण झाल्या असून या शेतकऱ्यांकडे आता शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे आता शेतपिकांचे नुकसान होणार नसून उपलब्ध असलेल्या विहिरीतील पाणीसाठ्यातून पिक...
 ‘ बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी ’ *स्पर्धेत शेतक-यांचा उर्त्‍फुत सहभाग यवतमाळ , दि. 12ः   बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतक-यांसाठी आयोजित ‘ बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धेला शेतक-यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाया सोबतच शेती जीवनाशी निगडीत प्रश्‍न विचारण्‍यात आले आहे. या स्‍पर्धेचे प्रथम दहा , व्दितीय सात तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस ठेवण्‍यात आले आहे.             शेतक-यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍या जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्‍हयात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतक-यांत जागृती व्‍हावी यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे. स्‍पर्धेची प्रश्‍नपत्रिका ही शेतक-यांना तहसील कार्यालयामार्फत तलाठी यांच्‍याकडून शेतक-यांना उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून प्रश्नांचे उत्तर देतांना नकळतच शेतक-यांना आपण कशाप्रकारे वागलो म्हणजे आपली मनोवृत्ती सकारात्मक राहिल व आपली आपल्या जीवनामध्ये कशी उन्नती होईल याबद्दलचा बोध ...
संपर्क अधिका-यांनी जाणून घेतल्‍या शेतक-यांच्‍या समस्‍या * आठ मंडळामधील 35 गावांचा समावेश यवतमाळ , दि. 12ः शेतक-यांच्‍या समस्‍या गावातच सोडविण्‍यासाठी ग्रामस्‍तरीय समितीची ज्‍या प्रमाणे स्‍थापना करण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे प्रत्‍येक मंडळासाठी संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्‍यात आली. या संपर्क अधिका-यांनी आपल्‍या मंडळातील जवळपास ३५ गावांना भेटी देवून शेतक-यांच्‍या आणि गावातील समस्‍या जाणून घेतल्‍या.             वणी तालुक्‍यातील वणी मंडळातील गणेशपूर , लालगुडा , वागद या गावी संपर्क अधिकारी असलेले तहसीलदार रवींद्र जोगे यांनी आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबाना भेटी देवून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. यामध्‍ये वागदरा येथील वसंतराव लटारी पावडे , गणेपूर येथील मधूकर विठू आसूटकर यांच्‍या कुटुंबांना भेटी देवून समस्‍या जाणून घेतल्‍या.त्‍याचप्रमाणेगावातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची सुविधा , गावालील शाळांची स्थिती , शेतकरी विद्यार्थ्‍यांची समस्‍या , अंगणवाडी , स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून शेतक-यांना मिळणारे धान्‍य , रेशनकार्ड धारकांची संख...
Image
प्रशिक्षीत युवकांना दिली मुद्रा योजनेची माहिती * आकपुरी येथे संवाद पर्व कार्यक्रम * युवकांना दिली मुद्रा योजनेची माहिती यवतमाळ, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आकपुरी येथे संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संवाद पर्व उपक्रमातून जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.  कार्यक्रमाला माहिती सहायक गजानन कोटुरवार, ज्येष्ठ पत्रकार राजकुमार भितकर, प्रकल्प शिक्षण सन्वयक सुनील भेले, आकपुरी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक आडे, मुख्याध्यापक संजीव राऊत, सन्वयक संजय सरोदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे धर्मेश रंगारी, सुनील कदम आदी उपस्थित होते. श्री. कोटुरवार यांनी देश आणि राज्य पातळीवर युवकांना कौशल्य पुरवून त्यांच्यात उद्योजकता निर्माण करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येत आहे. कुशल भारत योजनेतून युवकांना कौशल्य तर उद्योग उभारण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून विनातारण कर्ज उपलबध् करून देण्यात येत आहे. याचा प्रशिक्षित युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून शासकीय नोकऱ्या...