Posts

केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर व संत्रासाठी 30 नोव्हेंबर अंतीम दिनांक · बँकेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर देखील विमा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध

यवतमाळ, दि 19 ऑक्टोबर (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2022-23 अंबिया बहारामध्ये केळी व संत्रा या पिकांकरीता सहभाग नोंदविण्याचा अंतिम दिनाक अनुक्रमांक 30 ऑक्टोबर व 30 नोव्हेंबर असा असून शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 80 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 12 हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. व केळी पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 1 लाख 40 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये 7 हजार प्रति हेक्टर भरावयाचा आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरीता केळी पिकाची अंतीम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 तर संत्रा पिकाची अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई- 400063. ग्राहक सेवा क्र.:18001024088 दुरध्वनी क्र. 02268623005, ई–मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. यवतमाळ जि...

समाधान शिबीरातून पालकमंत्री सोडविणार नागरिकांच्या समस्या

· नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या यवतमाळ दि. 19 ऑक्टोबर (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे आयोजनातून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत. याकरिता नागरिकांनी आपल्या तक्रारी 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात सादर कराव्या, असे आवाहन पालकमंत्री राठोड यांनी केले आहे. नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, घाटंजी, केळापूर या तालुक्यांसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी व मारेगाव, वणी, झरीजामणी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, यवतमाळ या तालुक्यांसाठी दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी यवतमाळ येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय “समाधान शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. समाधान शिबीराकरिता प्रत्येक तहसिल कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून तेथे तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी सदर कक्षात आपल्या तक्रारी सादर करून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा. दिलेल्या तक्रारीवर संबंधीत विभागातर्फे कार्...

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिवस” संपन्न

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतरत्न तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकरिता पुस्तक पुनरावलोकन लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख तथा रासेयो कार्यकारी अधिकारी डॉ. जयश्री उघाडे ह्या उपस्थिती होत्या. याप्रसंगी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथाचे योगदान विषद करून वाचनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री उघाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. “वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे. वाचन संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे. वाचन ही जीवनभर पुरणारी ज्ञान संपदा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. भुषण जगताप यांनी केले. तसेच डॉ. प्रदिप थोरात, डॉ. निखील सोळंके श्री. आनंद भुसारी, डॉ. ज...

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात 'जागतिक अन्न दिन' साजरा

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे दिनांक १३ ते १७ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान जागतिक अन्न सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अन्न पदार्थांची होणारी नासाडी थांबविणे व प्रक्रिया युक्त पदार्थामध्ये त्याचे रुपांतर करून समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत अन्न पोहचविणे हा आहे. विध्यार्थांद्वारे समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे ह्याकरिता महाविद्यालयाच्या वतीने जागतिक अन्न सुरक्षा सप्ताह 2022 चे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांचे हस्ते विविध स्पर्धातील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार व अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त कृष्णराव जयपूरकर तर प्रमुख वक्ते म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे तसेच डॉ. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, डॉ. आशुतोष लाटकर, घनश्याम दां...

दिग्रस येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 179 उमेदवारांची निवड

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि बापूरावजी बुटले कला, नारायण भट वाणिज्य आणि बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस यांचे संयुक्त विद्यमानाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे उपस्थित होते. तसेच डी. व्ही. एस. पी. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार बंग, बुटले कॉलेजचे प्राचार्य कॅ. व्ही. एल. खळतकर आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे सदर रोजगार मेळाव्यास उपस्थित होत्या. सदर रोजगार मेळाव्यास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद दुबे यांनी मार्गदर्शन केले आणि मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी या रोजगार मेळाव्यात एकूण 13 नामांकित कंपन्या त्यांच्याकडील एकूण 1239 रिक्त पदाकरिता मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार असल्याचे सांगितले आणि त्याचा फायदा उमेदवारांनी आवर्जून घेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपले करिअर घडवण्याकरिता प्राप्त संध...

इतर मागासवर्ग वित्त महामंडळाच्या कर्ज योजना

यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- इतर मागासवर्गातील व्यक्ती, कुटूंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रुपये 10 लक्ष पर्यंतची कर्ज योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना या महत्वाच्या योजना राबविल्या जातात. यातील एक लक्ष व 10 लक्ष पर्यंतच्या कर्ज योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. रु. 1.00 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना : यात अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.1.00 लक्ष. लाभार्थींचा सहभाग निरंक राहील. दरमाह दोन हजार 85 रुपये याप्रमाणे 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित झालेल्या हप्त्यांवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. वैयक्तिक कर्ज व्य...

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-वन सादर करणे साठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर यवतमाळ, दि 18 ऑक्टोबर (जिमाका) :- यवतमाळ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे कडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसुचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. सप्टेंबर-2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करीता ई-आर-1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकिय / निमशासकिय/ खाजगी उद्योजक/ आस्थापना यांनी त्यांचे युझर आय.डी. व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करुन ऑनलाईन सादर करावयाची आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. ऑनलाईन ई आर – 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दुरध्वनी क्रमांक 07232-244395 ...