वृक्षलागवडीला लोकचळवळ बनविण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा
- पालकमंत्री
संजय राठोड
* जिल्ह्यात
वृक्षारोपणास प्रचंड प्रतिसाद
* जनक
नगरी येथे मुख्य वृक्षारोपण
* जिल्हाभर
ठिकठिकाणी वृक्षरोपणाची लगबग
यवतमाळ, दि. 1 : पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33 टक्के जमीन वृक्षाच्छादित असणे आवश्यक
आहे. प्रत्यक्षात 20 टक्केच क्षेत्रावर वृक्ष आहे. त्यातही पाच टक्के क्षेत्र विरळ
आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. पर्यावरणाच्या संतुलनासोबतच पुढच्या पिढीला चांगले नैसर्गिक
वातावरण निर्माण करून द्यावयाचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वृक्षारोपणाची
चळवळ गतीमान करण्यासाठी प्रत्येकाचा हातभार आवश्यक असल्याचे पालकमंत्री संजय राठोड
यांनी सांगितले.
दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात
15 लाखावर वृक्ष लागवड केले जात असून या मोहिमेचा शुभारंभ जाम रोडवरील जनक नगरीतील
वन विभागाच्या प्रस्तावित वन उद्यानात वृक्ष लागवड करून झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार
सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, उपवनसंरक्षक
प्रमोदचंद लाकरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी डॅा.शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, सामाजिक
वनीकरणचे उपसंचालक एम.आर.चेके आदी उपस्थित होते.
दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व बिघडत चाललेले पर्यावरणाचे
संतुलन यावर आळा घालण्यासाठी हा दोन कोटी झाडं लावण्याचा हा धडक कार्यक्रम वृक्ष, पर्यावरण
आणि जलसंवर्धनासाठी परिणामकारक ठरणार आहे. गावकऱ्यांना वनापासून बरेच फायदे आहेत. ग्रामस्थांनी स्वत:चे
गाव वनग्राम घोषित करुन प्रस्ताव वनविभागाकडे पाठवावे. यामुळे गावाचा विकास होण्यातही
हातभार लागेल. केवळ २ कोटी वृक्ष लागवड करून वन विभाग थांबणार नसून, पुढील तीन वर्षांत
राज्यात ४० कोटी वृक्ष लागवड केली जाणार आह, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पर्यावरणाचे संतुलन झाडे लावल्याशिवाय होणार नाही.
झाडे लावण्याची मोहिम केवळ फोटो काढण्यापुरती ठेऊ नका. ही मोहिम निरंतर सुरू ठेवा.
लावलेली झाले जगली आणि टिकली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एका झाडाची जबाबदारी घेतली
पाहिजे. जिल्ह्यातील सागवान अतिशय चांगल्या प्रतिचे आहे. सागवानाची ही झाडे वाढली पाहिजे.
जिल्ह्यात काही ठिकाणी चंदनही आहे. चंदनाचे क्षेत्र वाढले पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक ऊईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप
सिंह यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे यांनी केले. यावेळी
जनक नगरीतील प्रस्तावित वन उद्यानातील जागेत पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांची वृक्षारोपण
केले. मुख्य समारंभाच्यावेळी दोन हजार झाडे लावण्यात आली.
पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य वृक्षारोपण समारंभस्थळासह
जिल्ह्यात ठिकठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले. दारव्हा येथील वन उद्यान, दारव्हा तालुक्यातील
देऊळगाव वळसा, विद्युत पारेषण कंपनीच्या लोहारा एमआयडीसी येथील विस्तारीत क्षेत्र,
दिग्रस तालुक्यातील भवनी टेकडी येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणासाठी जिल्हाभर विविध सामाजिक संघटना पुढे
आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, एनसीसीचे विद्यार्थी, महिला, पुरूष
स्वयंस्फूर्ती या उपक्रमात सहभागी झाले होतो. जिल्ह्यात १५ लाख ५० हजारावर वृक्ष लावण्याचे उद्दिष्ठ होते. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त वृक्षांची
लागवण होण्याची शक्यता आहे.
00000000000000
टिश्यू कलचर बर्मा सागवान रोपे ,
ReplyDeleteटिशयूकलचर सागवान रोपे ,
1 वर्षात 15 ते 18 फूट वाढते ,
लॅब व सागवान बाग पाहण्यासाठी ,
बर्मा सागवान रोपे ,
फांदी नसते फकत पाने असतात ,
2 वर्षात 35 ते 40 फूट वाढते ,
सोटमूळ असते , पाणी कमी लागते ,
कोणतीही आतरपिके घेता येतात
उदाहरणार्थ ऊस,मका,केळी,मिरची असे कोणतेही आतरपिके घेता येतात
2 वर्षानंतर जाड़ी सुरुवात होते
सल्ला व मार्गदर्शन,
उत्पन्न 8 ते 9 वर्षा मधये 18 ते 20 घनफूट लाकूड मिळते,
जनावरे खात नाहीत ,
एकरी 605 रोपे ,
आजचा दर 3000 ते 3500 , पतिघनफूट
मनुष्य बळ जास्त लागत नाही ,
बाराही महिने लागवड़ करता येते ,
लाखात उत्पादन ,
टिश्यू कल्चर सागवान, टिश्यू कल्चर ड़ाळीब ,टिश्यू कलचर केळी,चंदन रोपे उपलब्ध
टिप -2 वर्ष गॅरंटी
8 वर्षात 1 झाड़ा पासून 20000 रुपये उत्पादन
सल्ला व मार्गदर्शन मिळेल
लागवड़ अतर 8 ×8 = 680 रोपे एकरी
8 × 9 = 570 रोपे एकरी रोपे
1000 रोपे 65 रुपये दर ,1000 पुढे कितीही रोपे 60 रुपये
अॅडव्हान्स बुकिंग चालू आहे ,संपर्क - मो न .9822050489 / 9763396793
टिश्यू कलचर बर्मा सागवान रोपे ,
ReplyDeleteटिशयूकलचर सागवान रोपे ,
1 वर्षात 15 ते 18 फूट वाढते ,
लॅब व सागवान बाग पाहण्यासाठी ,
बर्मा सागवान रोपे ,
फांदी नसते फकत पाने असतात ,
2 वर्षात 35 ते 40 फूट वाढते ,
सोटमूळ असते , पाणी कमी लागते ,
कोणतीही आतरपिके घेता येतात
उदाहरणार्थ ऊस,मका,केळी,मिरची असे कोणतेही आतरपिके घेता येतात
2 वर्षानंतर जाड़ी सुरुवात होते
सल्ला व मार्गदर्शन,
उत्पन्न 8 ते 9 वर्षा मधये 18 ते 20 घनफूट लाकूड मिळते,
जनावरे खात नाहीत ,
एकरी 605 रोपे ,
आजचा दर 3000 ते 3500 , पतिघनफूट
मनुष्य बळ जास्त लागत नाही ,
बाराही महिने लागवड़ करता येते ,
लाखात उत्पादन ,
टिश्यू कल्चर सागवान, टिश्यू कल्चर ड़ाळीब ,टिश्यू कलचर केळी,चंदन रोपे उपलब्ध
टिप -2 वर्ष गॅरंटी
8 वर्षात 1 झाड़ा पासून 20000 रुपये उत्पादन
सल्ला व मार्गदर्शन मिळेल
लागवड़ अतर 8 ×8 = 680 रोपे एकरी
8 × 9 = 570 रोपे एकरी रोपे
1000 रोपे 65 रुपये दर ,1000 पुढे कितीही रोपे 60 रुपये
अॅडव्हान्स बुकिंग चालू आहे ,संपर्क - मो न .9822050489 / 9763396793