शासकीय कर्मचाऱ्यांना विमा छत्र योजना लागू
यवतमाळ, दि. 15 : शासनाच्या निर्णयानुसार दिनांक  1 जुलै ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी, तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना वैद्यकीय प्रतीपुर्ती विमाछत्र योजना सक्तीची लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संबधित कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे विमाछत्र योजनेबाबतचे वेतन अग्रिम देयक कोषागारास त्वरीत सादर करुन योग्य रकमेचा धनादेश, RTGS सोबत विहित प्रपत्रासह कोषागारास सादर करण्यात यावे. याबाबत संबंधित कार्यालयांनी त्वरीत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भेांडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित