अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
ख्‍
यवतमाळ, दि. 2 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 11 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत,  असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
दहावी, बारावी, पदवी, पदव्युतर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित