छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 12 : राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण आणि संवर्धनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा पुरस्कार विभाग आणि राज्यस्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, तसेच ग्राम, विभाग, जिल्हा या संवर्गातून देण्यात येत आहे. महसूल विभागस्तरावर पहिला 50 हजार रूपये, दुसरा 30 हजार रूपये, तर राज्यस्तरावर पहिला 1 लाख, दुसरा 75 हजार, तिसरा 50 हजार रूपये पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी किमान तीन वर्षे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्य केले असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी उपसंचालक, सामाजिक वनीकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित