मुख्यालयी न राहणा-या
कर्मचा-यांवर कारवाई करा
* ग्रामस्तरीय समितीला तक्रार करण्याचे
आवाहन
यवतमाळ, दि. २९ः
शेतक-यांसाठी खरीप हंगाम हा महत्वाचा काळ असून यावेळी शेतक-यांना आलेल्या अडचणी
सोडविण्यासाठी गावातील कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषिसहायक, ग्रामसेवक,
पोलीस पाटील हे मुख्यालयी राहत नाही. अशा कर्मचा-यांवर संबंधीत
अधिका-यांनी सक्त कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह
यांनी दिले आहे. तसेच मुख्यालयी न राहणा-या अशा कर्मचा-यांची तक्रार संबंधीत
विभागकडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात ग्रामस्तरीय
समितीने व शेतक-यांनी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हा
प्रशासनाच्या वतीने शेतक-यांना धीर देण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान
राबविण्यात येत आहे. यातून शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विविध
उपाययोजना सुरू करण्यात आल्या. सद्या शेतक-यांच्या पेरणीचा, लागवडीचा हंगाम सुरू आहे. तसेच शेतक-यांना कर्ज वाटपही करण्यात येत
आहे. या काळात गावात शेतकरी व नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामसेवक, कृषिसहायक, पोलीस पाटील या शासकिय कर्मचा-यांची मोलाची भूमिका असते. मात्र,
हेच कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी जिल्हा
प्रशासनाकडे आल्या आहे. त्यामुळे शासकिय कर्मचारी मुख्यालयी
राहत नसल्या कारणारे शासन योजनांचा लाभ शेतक-यांना मिळू शकत नाही.
परीणामी असे मुख्यालयी न
राहणा-या, शेतक-यांची कामे तुंबून
ठेवणा-या, शेतक-यांना सहकार्य न करणा-या
कर्मचार-यांविरूध्द कार्यवाही करणाचे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात आले आहे.
तसेच गावस्तरावर ग्रामस्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. ज्या गावचे
कर्मचारी त्या गावी राहत नसतील, गावी येत नसतील, शेतक-यांना उचित सेवा देत नसतील अशा कर्मचा-यांच्या तक्रारी ग्रामस्तरीय
समितीने संबंधीत विभागांच्या अधिका-यांकडे करावी
व त्यांची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान
कक्षात सादर करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment