हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन
पालकमंत्र्यांसह
मान्यवरांकडून हारार्पण
यवतमाळ, दि. 1 : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक
यांचा जन्मदिवस दरवर्षी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येते. जिल्ह्यात हा दिवस आज
ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या
पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी
पुतळ्यास पुष्पमाला अर्पण केली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस
अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेचे सभापती सुभाष
ठोकळ, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.शरद कुळकर्णी,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, प्राचार्य शंकरराव सांगळे, डॅा.टी.सी.राठोड
यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी वसंतराव
नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली. यावेळी प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी
वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांच्या काही आठवणी विषद केल्या.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी दोन टोकी वृक्ष
लागवडीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणही
करण्यात आले.
00000000000000
Comments
Post a Comment