आज केबल ऑपरेटर निवडीसाठी सोडत
यवतमाळ, दि. 1 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम)
सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणिबहुविध यंत्रणा
परिचालकाची निवड शनिवार, दि. २ जुलै रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त
कार्यालयाच्या सभागृह क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर
व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार आहे. सोडतीकरीता
जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment