रोजगार निर्मितीचे माध्‍यम म्‍हणजे व्‍यवसाय
- केंद्रिय राज्‍यमंत्री अहीर
* मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मेळावा
* चेतना अभियानाचा उपक्रम
यवतमाळ, दि. 3 : रोजगार निर्मितीचे सर्वात मोठे माध्‍यम म्‍हणजे व्‍यवसाय होय. यासाठी केंद्र शासनाने कर्ज उपलब्‍ध करून देण्‍यासाठी बॅंकामार्फत शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी  विविध योजना सुरू करण्‍यात आल्‍या. याचा लाभ घेउन उद्योजक व्‍हावे,  आपल्‍या पायावर सक्षमपणे उभे राहावे. असे आवाहन रसायन व उर्वरक केंद्रीय राज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी आवाहन केले.
बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री मुद्रा योजना व सामाजिक योजना साक्षरता अभियान कार्यक्रमात उद्घाटक म्‍हणून रविवारी दि. ३ जुलै रोजी  डॉ.नंदुरकर विद्यालयाच्‍या सत्‍य साई रंजन सभागृहात बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी आमदार मदन येरावार उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्‍हणून पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार अशोक उईके, जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, राजेंद्र डांगे, अग्रणी जिल्‍हा प्रबंधक प्रशांत देशपांडे, समुपदेशक विजय ढोक उपस्थित होते.
            पुढे बोलताना अहिर म्‍हणाले, बेराजगारीदूर होण्‍यासाठी या योजनांची मदत होणार आहे.  मुद्रा योजना,प्रधानमंत्री अटल पेन्‍शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, स्‍टॅंड अप इंडिया, प्रधानमंत्री जनधन योजना राबविण्‍यात येत आहे. कर्जसाठी कुठल्‍याही प्रकारचे गहान ठेवाव्‍या लागत नाही. त्‍यामुळे याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाने सर्व सामान्‍य जनेतला केंद्रबिंदू माणून त्‍यांच्‍या हिताचे निर्णय घेत आहे. त्‍यामुळे बॅंकामार्फत योजना सुरू करण्‍यात आल्‍या. बेरागजगारी, शेतक-यांना प्रक्रिया उद्योग यासाठी कर्ज मिळण्‍यार आहे याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले.
अध्‍यक्षीय भाषणातून आमदार मदन येरावार यांनी आपल्‍या शेतकरी, शिक्षित बेरोजगारांनी बाजारपेठ पाहून व्‍यवसाय उभारावा आणि आपल्‍या भविष्‍याचा मार्ग सुकर करावा असे आवाहन केले. आमदार राजू तोडसाम यांनी शासनाने युवकांना रोजगार मिळण्‍यासाठी त्‍यांच्‍या हाताला काम मिळण्‍यासाठी या योजना आहेत. यातून युवकांचा शेतक-यांचा विकास होणार असल्‍याचे बोलले. जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकेतून शेतक-यांनी दालमिल, मधूमक्षीका पालन, कुक्‍कुट पालन, शेळी पालन यासारखे उद्योग उभारण्‍यासाठी शेतक-यांना कर्ज यातून मिळणार आहे. तसेच बॅंकांनी नागरिक व शेतक-यांकडून अनावश्‍यक कागतपत्रे न मागता कर्ज उपलब्‍ध करून द्यावे. तसेच पुढील तीन महिन्‍यात मुद्रा योजना, विमा योजना यासाठी जागृती करून जास्‍तीत जास्‍त नागरिकांना लाभ मिळवून देणार असल्‍याचे सांगितले.
निवासी उपजिल्‍हा धिकारी राजेश खवले बळीराजा चेनता अभियान हे शेतक-यांना, त्यांच्‍या पाल्‍यांना स्‍थैय आणि धैर्य देउन सक्षमपणे त्‍यांना स्‍वतःच्‍या पायावर उभे करण्‍याची आहे. त्‍यामुळे शेतकरी उद्योजक कसा होईल, प्रक्रिया उद्योगकसे साकारता येईलयासाठी  शासनच्‍या योजनांचा लाभ घ्‍यावा. तसेच   जिल्‍हयातील प्रत्‍येक नागरिकांनी पुढे येउन शेतक-यांना मदत करावी असे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयात २० बॅंकांचे स्‍टाल लावण्‍यात आले असून नागरिकांनी योजनांची माहिती मिळवून कर्जासाठी अर्ज सादर केले. 

0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती