शेतकरी कुटुंबाला मिळाला विम्‍याचा लाभ
*पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा
*बडोदा बॅंकेकडून तातडीने मदत
यवतमाळ, दि. 5 : कुटुंबावर कधी कुठले संकट येईल हे सांगता येत नाही. त्‍यामुळे अचानक आलेल्‍या आघातातून सावरण्‍यासाठी त्‍यांना आर्थिक मदत करण्‍यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजना अंमलात आणली. या विमा योजनेतून घाटंजी तालुक्‍यातील पार्डी नस्करी येथील रामधन पवार यांच्‍या कुटुंबियांना तातडीने दोन लाखांची मदत बॅंकेडून वितरीत करण्‍यात आली. त्‍यामुळे  जिल्‍ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
जिल्‍ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत असून प्रत्‍येक गावात शेतकऱ्यांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. शेतकऱ्यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी  प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी कार्य करीत असल्‍याने सकारात्‍मक संदेश यातून जात आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळल्‍याचे हे उदाहरण म्‍हणता येईल. 
घाटंजी येथील रामधन पवार यांनी बॅंक ऑफ बडोदा या बॅंकेतून पत्‍नी पद्मा पवार यांचा पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा काढला होता. त्‍यांचा दिर्घ आजाराने मृत्‍यू झाला. याची माहिती बॅंक ऑफ बडोदा यांना कर्ज पुनर्गठन शिबिराच्‍या वेळी मिळाली. मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे या पद्मा पवार या महिलेच्‍या कागदपत्रांची तपासणी केली. त्‍यांच्‍या कुटुंबियातील संदीप पवार यांना पद्मा पवार यांच्‍या मृत्‍यूपत्र आणि इतर कागदपत्रांची मागणी केली. मृत्‍यूपत्र मिळता यासंबंधातील कागदपत्रे बॅंक ऑफ बडोदाने विमा कंपनीकडे सादर करण्‍यात आली. त्‍यामुळे त्‍यांना ३० दिवसाच्‍या आत पंतप्रधान जीवनज्‍योती विमा योजनेची दोन लाखांची रक्कम वारसाच्‍या  खात्‍यामध्‍ये इंडिया फस्‍ट लाईफ विमा कंपनीने पूर्तता केली.
यासाठी बॅंकेने केलेला पाठपुरावा महत्‍वाचा ठरला आहे. त्‍यामुळे शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत मिळाली. शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी बॅंकेचे अभिनंदन केले आहे. जिल्‍ह्यातील सर्वच बॅंकांनी अशा प्रकारचे प्रकरणे असेल ताडीने निकाली काढावे, असे आवाहनही करण्‍यात आले. अल्‍प रूपयांत प्रत्‍येक नागरिकांनी आपला पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती