आज मद्यविक्रीस बंदी

यवतमाळ, दि. 5 : रमजान ईद उत्सव बुधवार, दि. 6 रोजी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने जिल्ह्यात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दिनांक 6 जून रोजी मद्य विक्रीच्या सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. या दिवशी मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …