आज मुद्रा योजना व प्रधानमंत्री
सामाजिक योजना साक्षरता मेळावा
यवतमाळ, दि . २ ः नागरिकांसाठी बॅंकामार्फत विविध कर्ज व इतर सामाजिक लाभाच्‍या योजना सुरू करण्‍यात आल्‍या आहेत. याची माहिती जिल्‍हयातील नागरिकांना मिळावी यासाठी बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. हा मेळावा रविवारी दि. ३ जुलै रोजी डॉ. नंदुरकर विद्यालयाच्‍या सत्‍य साई क्रिडारंजन सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
            केंद्र शासनाकडून बेरोजगार शिक्षितांसाठी, शेतकरी, नागरिक यांना कर्ज उपलब्‍ध करून त्‍यांना व्‍यवसाय उभारता यावा यासाठी मुद्रा योजना सुरू करण्‍यात आली. याची माहिती या मेळाव्‍यात मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री अटल पेन्‍शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, स्‍टॅंड अप इंडिया योजनेची माहिती या मेळाव्‍यातून मिळाणार आहे. या मेळाव्‍याचा लाभ नागरिकांनी घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मेळाव्‍याचे आयोजक  समुपदेशक सेंन्‍ट वित्‍तीय  साक्षरता केंद्राचे विजय ढोक यांनी केले आहे.
डॉ. नंदूरकर विद्यालयाच्‍या सभागृहात होणा-या या मेळाव्‍यात जिल्‍हयातील १७ राष्‍ट्रीयीकृत बॅंकाव ३ व्‍यापरी बॅंकांचे स्‍टाल लावण्‍यात येणार असून यातून नागरिकांना मुद्रा योजना व प्रधानमंत्री सामाजिक योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे.        
या योजनांचा मिळणार लाभ
* प्रधानमंत्री मुद्रा योजना,
* प्रधानमंत्री अटल पेन्‍शन योजना
* प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना
* प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना
* स्‍टॅंड अप इंडिया
* प्रधानमंत्री जनधन योजना

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती