लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्रावर जमावबंदी
यवतमाळ, दि. 27 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे रविवारी, दिनांक 31 जुलै रोजी सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी फौजदारी दंड प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 जारी केले आहे.
या कलमातील तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच परीक्षा चालू असताना सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत परीक्षार्थी आणि परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित