लोकशाही दिनी 73 निवेदने दाखल
यवतमाळ, दि. 4 : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या लोकशाही दिनात एकूण 73 तक्रारी, निवेदने दाखल झाली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा त्यांनी यावेळी घेऊन प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना केल्या.
लोकशाही दिन कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अखिलेखकुमार सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. मागील लोकशाही दिनातील 139 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.


00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती