यवतमाळात
खुल्या कारागृहासाठी प्रयत्न करणार
- पालकमंत्री संजय राठोड
कारागृहाच्या बगीच्यात वृक्षारोपन
यवतमाळ,
दि. 2 : दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतंर्गत जिल्हा कारागृहाच्या बगीचा
क्रमांक 2 येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी बोलतांना यवतमाळ खुल्या कारागृहासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे
पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास
खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, प्रमुख जिल्हा व
सत्र न्यासाधिश दिलीप शिरासाव, न्यायाधिश वाघमारे, न्यायाधिश खुने, न्यायाधिश
देशपांडे, कारागृह अधीक्षक मंगेश जगताप, कारागृह अधिकारी हिरालाल भांबरे आदी
उपस्थित होते.
बसस्थानकालगत
असलेल्या कारागृहाच्या बगीचा क्रमांक 2 येथे पालकमंत्री व मान्यवरांच्याहस्ते
वृक्षारोपन करण्यात आले. राज्यात काही ठिकाणी खुल्या कारागृहाचा वापर करण्यात आला
आहे. यवतमाळ येथेही खुले कारागृह होवू शकते तशा प्रस्ताव शासनास सादर करणार
असल्याचे पालकमंत्री म्हणाले. कारागृहाच्चा सोईसुविधांना प्राधान्य दिले जात असून
कारागृह प्रशासनाला चार सर्च लाईट खरेदीसाठी 4.80 लाख, सौर ऊर्जा संच खरेदी करीता
4.45 लाख, साऊंड सिस्टिमसाठी 81 हजार, कारागृहात 10 दुरदर्शन संच बसविण्यासाठी
2.10 लाख तर व्यायाम साहित्यसाठी 7 लक्ष याप्रमाणे 19.16 लक्ष रूपये देण्यात आले
असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
00000

Comments
Post a Comment