रविवारी मुद्रा योजना व प्रधानमंत्री
सामाजिक योजना साक्षरता मेळावा
* केंद्रिय राज्‍यमंत्री अहिर यांच्‍या हस्‍ते उद्घाटन
* बळीराजा चेतना अभियानाचा उपक्रम
यवतमाळ, दि, १ :  केंद्र शासनाच्‍यावतीने नागरिकांसाठी बॅंकामार्फत विविध कर्ज व इतर सामाजिक लाभाच्‍या योजना सुरू करण्‍यात आल्‍या आहेत. याची माहिती जिल्‍हयातील नागरिकांना मिळावी यासाठीबळीराजा चेतना अभियानाअंतर्गत मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. हा मेळावा रविवारी दि. ३ जुलै रोजी  डॉ. नंदुरकर विद्यालयाच्‍या सत्‍य साई क्रिडारंजन सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्‍यात आला आहे. या मेळाव्‍याचे उद् घाटन केंद्रिय रसायन व उर्वरक राज्‍यमंत्री हंसराज अहिर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे.
प्रमुख पाहूणे म्‍हणून पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्‍यमंत्री रणजित पाटील, वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी,जिल्‍हा परीषदेच्‍या अध्‍यक्षा डॉ. आरती फुपाटे,खासदार भावणा गवळी, खासदार राजीव सातव, खासदार विजय दर्डा,आमदार मदन येरावार,आमदर मनोहर नाईक,आमदार  राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोथकुरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार अशोक उईके, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संजय बाजोरीया, आमदार ख्‍वाजा बेग, आमदार हरिभाउ राठोड, आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, जिल्‍हा पो‍लीस अ‍धीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, जिल्‍हा अग्रणी प्रबंधक प्रशांत देशपांडे (सेंट्रल बॅक ऑफ इंडिया)उपस्थित राहणार आहे.
            केंद्र शासनाकडून बेरोजगार शिक्षितांसाठी,शेतकरी, नागरिक यांना कर्ज उपलब्‍ध करून त्‍यांना व्‍यवसाय उभारता यावा यासाठीमुद्रा योजना सुरू करण्‍यात आली. याची माहिती या मेळाव्‍यात मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री अटल पेन्‍शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्‍योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, स्‍टॅंड अप इंडिया योजनेची माहिती या मेळाव्‍यातून मिळाणार आहे. या मेळाव्‍याचा लाभ नागरिकांनी घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
डॉ. नंदूरकर विद्यालयाच्‍या सभागृहात होणा-या या मेळाव्‍यात जिल्‍हयातील १७ राष्‍ट्रीयीकृत बॅंका व ३ व्‍यापरी बॅंकांचे स्‍टाल लावण्‍यात येणार असून यातून नागरिकांना मुद्रा योजना व प्रधानमंत्री सामाजिक योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे. या मेळाव्यात मुद्रा योजना, प्रधानमंत्री अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे.

0000000000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती