माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थी मागे पडता कामा नये
- पालकमंत्री संजय राठोड
सोनवाढोणा येथे डिजीटल शाळेचे उद्घाटन
यवतमाळ,
दि. 2 : आजच्या घडीला स्पर्धा प्रचंड वाढली आहे. माहिती
तंत्रज्ञानामुळे कालचे ज्ञान आज जूने होते अशी स्थिती आहे. या तंत्रज्ञानाच्या
युगात ग्रामीण विद्यार्थी मागे राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सोनवाढोणासारख्या गावाने स्पर्धेचे हे युग पाहता लोकवर्गणीतून केलेली डिजीटल शाळा
अतिशय अभिनंदनीय उपक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
नेर
तालुक्यातील सोनवाढोणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजीटल शाळेचे उद्घाटन
पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती भरत मसराम तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा
परिषद सदस्य भिमराव राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, पंचायत समिती
सदस्य मिना खांदवे, गटशिक्षणाधिकारी युवराज मेहत्रे, नामदेव खोब्रागडे, सरपंच
मिलींद भगत, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.
लोकवर्गणीतून
डिजीटल शाळा करण्याचा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामीण विद्यार्थी मागे पडता कामा नये, यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार फार आवश्यक
आहे. त्यासाठीच डिजीटल शाळेचा उपक्रम आखण्यात आला आहे. शिक्षकांनीही आधुनिक
तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवनवीन माहितीचे आदान-प्रदान व्हावे यासाठी
शिक्षकांनीही उपक्रमशिल राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून
शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे.
शिक्षक,
विद्यार्थी आणि पालक हे तीनही घटक एकत्र आल्यास उच्च तंत्रज्ञानावर आधारीत
शिक्षणप्रणाली विकसीत झाल्याशिवाय राहणार नाही, असेही याप्रसंगी पालकमंत्र्यांनी
सांगितले. सोनवाढोणा हे गाव आदर्श बनवा यासाठी लागणारी शासकीय मदत आपण उपलब्ध करून
देवू, असेही पालकमंत्री याप्रसंगी म्हणाले.
सभापती
भरत मसराम, जिल्हा परिषद सदस्य भिमराव राठोड यांच्यासह अन्य मान्यवरांचीही यावेळी
भाषणे झाली. सुरुवातीश पालकमंत्र्यांनी डिजीटल वर्ग खोलीचे फित कापून उद्घाटन
केले. तसेच विद्यार्थ्यांकडून माहितीही जाणून घेतली. प्रास्ताविक शाळेचे
मुख्याध्यापक श्री.डोंगरे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी प्रणीता गाढवे यांनी
मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
000000
Comments
Post a Comment