शाळेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांचे
सामाजिक क्षेत्रातील लोकांशी चर्चा
* सुचना जाणून घेतल्या
* शाळांसाठी नियमावली करणार
यवतमाळ, दि. 3 : शाळांमध्ये
अल्पवयीन मुलींच्याबाबतीत होत असलेले गैरप्रकार थांबविण्यासाठी तसेच शाळा
प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सामाजिक
क्षेत्रातील नागररिकांशी महसूल भवन येथे आज चर्चा केली. तसेच यावर आळा घालण्यासाठी
काय उपययोजना करता येईल त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी सुचना मागविल्या.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी
राजेश खवले, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसिलदार सचिन शेजाळ,
सामाजिक क्षेत्रातील डॉ.विजय कावलकर, दत्ता कुलकर्णी, कमलाकर बागडी, डॉ.छाया महाले,
प्राचार्य अविनाश शिर्के, राजू पडगिरवार, प्रा.घनश्याम दरणे, प्रा.अमोल देशमुख,
डॉ.दिलीप महाले, ॲड. जयसिंग चव्हाण, सुनिल
भेले, मन्सूर एजाज जोश, कमल मिश्रा, पांडुरंग खांदवे यांच्यासह विविध सामाजिक
क्षेत्राचे गनमान्य व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांकडून शाळा व
शाळा प्रशासनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाकडून सुचना जाणून
घेतल्या. अनेकांनी यावेळी उपयुक्त सुचना केल्या. मुलींच्याबाबतीत होणारे गैरप्रकार
थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियमावली तयार केली जाणार असून शाळांना
त्या नियमावलीत सुरक्षात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहे. सामान्य नागरिकांनाही
सुरक्षेच्यादृष्टीने काही उपाययोजना सुचवावयाच्या असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात
लेखी सादर कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment