जुलै महिन्याचे अन्नधान्याचे परिमाण व दर जाहिर

यवतमाळ, दि. 2 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाचे जुलै महिन्याचे अन्नधान्याचे दर व परिमाण जाहिर करण्यात आले आहे. निर्धारीत दर व परिमाणानुसार वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केल्या आहेत.
            कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेले गहू, तांदुळ, साखर, केरोसीनचा यात समावेश आहे. बीपीएल, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, एपीएल तसेच कल्याणकारी संस्था व वसतीगृहांसाठीच्या दरांचा यात समावेश आहे. शिधा पत्रिकाधारकांना देय असलेल्या प्रमाणात तातडीने या वस्तुंचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. ज्या व्यक्तींनी धान्याची उचल केली नसेल त्यांना पुढील महिन्यात धान्य वाटप करावयाचे आहे. धान्यवाटप चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित