प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू
*पिकांचे प्रतिहेक्टरी हर जाहिर
यवतमाळ, दि. 8 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे.
पिक विम्यासाठी पीक निहाय विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे. भात 780 रूपये, ज्वारी 480, भुईमूग 600, सोयाबीन 720, मूग 360, उडीद 360, तूर 560, कापूस 1800 रूपये प्रति हेक्टरी विमा हप्ता भरावा लागणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून यासाठी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेडची निवड करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित