कृषी सप्ताहात शेतक-यांसाठी उपक्रम राबवा
* ग्रामस्‍तरीय समित्‍यांचा सहभाग मोलाचा
यवतमाळ, दि. २ः  गावातील शेतक-यांना शासनाच्‍या विविध योजना, जोडधंदे, विविध पिकांची माहिती, हंगामात पिकांची निगा कशी राखायची यासारखे उपयुक्‍त माहिती शेतक-यांना कृषी सप्‍ताहात शेतक-यांना द्या. यासाठी गावात गठीत करण्‍यात आलेली ग्रामस्‍तरीय समितीची महत्‍वाची भूमिका घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.  शुकवारी दि. १ जुलै रोजी कृषी सप्‍ताहाच्‍या निमित्‍ताने शेतक-यांना माहिती देण्‍यासाठी काय उपाययोजना आखण्‍यात आल्‍या यासंदर्भात आढावा बैठक घेण्‍यात आली. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले, जिल्‍हा नियोजन अधिकारी श्री. राठोड, कृषी उपसंचालक रमेश धुमाळ, प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) अनिल इंगळेउपविभागीय कृषी अधिकारी श्री. नाईक उपस्थित होते.
            यावेळी जिल्‍हाधिकारी  यांनी गावामध्‍ये सप्‍ताहा निामित्‍त मृदा परीक्षण, प्रगतशील शेतक-यांचे मेळावे, कृषी विज्ञान केंद्रातील तज्‍ज्ञांकडून शेतक-यांना मार्गदर्शन कृषी मेळावे, गावामध्‍ये ग्रामस्‍तरीय समिती सारखीच कृषी व पशूसंवर्धन समित्‍या स्‍थापन करने, शेतक-यांना शेतीसोबतच प्रकिया उद्योग सुरू करण्‍यासाठी मार्गदर्शन करणे, शेतक-यांच्‍या हिताच्‍या योजनांची माहिती शेतक-यांना देणे. यामध्‍ये पंतप्रधान पिक विमा योजना, जलयुक्‍त शिवार योजना, मागेल त्‍याला शेततळे योजना, मृद आरोग्‍य,अभियान, रोजगार हमी योजनेची निगडीत फळबाग लागवड योजना, महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंढे शेतकरी जनता अपघात विमा योजना, कडधान्‍ये आंतर पिके, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, बहुपिक पध्‍दती व पिक उत्‍पादन खर्चात बचत, रासायणिक खतांच्‍या खर्चात बचत, पिकांवरील रोग, बियाण्‍यांच्‍या बाबतीत घ्‍यावयाची काळजी अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन कृषि सप्‍ताहात करून बळीराजाला उभारी द्यावी. तसेच गावासाठी नियुक्‍त केलेल्‍या संपर्क अधिकात्‍यांनी गावात जावन कार्यक्रम राबविण्‍याच्‍या सुचना करण्‍यात आल्‍या. या बैठकिला उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.         
शेतक-यांचे  प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सर्वांचे प्रयत्‍न
राबविण्‍यात येत असलेल्‍या  बळीराजा चेतना अभियानामुळे शेतक-यांत मोठया प्रमाणत जावीव व जागृती होत आहे. मागील सहामहीन्‍यात बाभुळगाव तालुक्‍यात एकही आत्‍महत्‍या झाली नाही. तर जून महिन्‍यात राळेगाव, आर्णीझरीजामणी, महागाव, पुसद, बाभुळगाव, दिग्रस आणि पांढरकवडा या तालुक्‍यात आत्‍महत्‍या झाल्‍या नाही. हे या अभियानाची फलश्रृती असून यामधील तहसीदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेव, पोलीस पाटील, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी ग्रामस्‍तरीय समितीच्‍या माध्‍यमातून केलेल्‍या कामामुळेच शेतक-यांचे प्रश्‍न सुटत असल्‍याचे बैठकित सांगितले. 

००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती