यवतमाळ पब्लिक स्कूल आजपासून सुरू करण्याचा निर्णय
* शिक्षण उपसंचालक, शिक्षकांमध्ये चर्चा
* विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 4 : यवतमाळ पब्लिक स्कुलमध्ये घडलेल्या प्रकारापासून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यस्तरीय समितीने ही शाळा मंगळवार, दि. 5 जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती येथील शिक्षण उपसंचालक एस. बी. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 4 जुलै रोजी यवतमाळ पब्लिक स्कुल येथे सर्व शिक्षकांसमवेत चर्चा केली. यात उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री. कुळकर्णी यांनी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा दिली. तसेच येत्या काळात अशा प्रकारच्या घटना होऊ  नये यासाठी सतर्क राहून आत्मविश्वासाने कार्य करण्यास सांगितले. यावेळी पालकांनी कोणतीही भिती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठविण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शासनाकडून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांची शाळेवर नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे उपशिक्षणाधिकारी आर. डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती