यवतमाळ जिल्हा
न्यायालयात वृक्षारोपण
यवतमाळ, दि. 2 : राज्यातील 2 कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमानिमित्त्य
यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश
दि. रा. शिरासाव यांच्या अध्यक्षेखाली वृक्षरोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश ए. एस. वाघमारे, पी. एस. खुने, मुख्य
न्यायदंडाधिकारी आर. पी. देशपांडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर डी. एन. खडसे, एच.
एल. मनवर, एम. एस. तिवारी, श्रीमती वाय. एम. तिवारी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे
सचिव एम. एस. आगरकर, दिवाणी न्यायाधिश कनिष्ठस्तर जे. एम. चव्हाण, श्रीमती आर. डी.
पुनसे, श्रीमती पी. पी. ढोके, श्रीमती सी. एम. ढबाले, जिल्हा वकील संघटनेचे ॲड. ठाकरे,
ॲड. गुप्ता, प्रबंधक श्री. शिरभाते, व्यवस्थापक श्री. वानखेडे आदी उपस्थित होते. श्री.
शिरासाव यांनी वृक्षरोपणाचे महत्त्व सांगितले. तसेच अधिकाधिक झाडे लावून जगविण्याबाबत
मार्गदशन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी वृक्षरोपन केले.
नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षरोपण
नेहरु युवा केंद्राशी संलग्नित युवा आणि महिला मंडळातर्फे
गावागावात वृक्षरोपण करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने एका गावात 100 झाडे लावून
ती जगवण्याची जवाबदारी ही मंडळे घेणार आहेत. तसेच नागरीकांनी प्रत्येक घरासमोर एक झाड
लावावे यासाठी केंद्र प्रयत्नशिल आहे.
000000

Comments
Post a Comment