बेंबळाच्या संपादीत जमिनीवर पेरणी करू नये
यवतमाळ, दि. १८ : बेंबळा प्रकल्पाचा पाणीसाठा पूर्ण संचय पातळीपर्यंत भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी संपादीत जमिनीमध्ये कोणीही वहिती किंवा पेरणी करून नये, असे आवाहन बेंबळा प्रकल्प विभागातर्फे करण्यात आले आहे.
या जमिनीवर पेरणी किंवा वहिती केल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासन किंवा बेंबळा प्रकल्प विभाग जबाबदार राहणार नाही, तसेच प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रालगतच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता डी. जे. राठोड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित