कृषि विज्ञान केंद्रात
वृक्षारोपण
यवतमाळ, दि. 4 : यवतमाळ येथील कृषिविज्ञान केंद्रात 1 जुलै
रोजी कृषि दिनानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम
समन्वयक डॉ. अनिल ठाकरे अध्यक्षस्थानी होते. याठिकाणी 50 रोपांची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
लागवड केली. या सप्ताहादरम्यान कार्यालय आणि परिसरात 100 रोपे लागवड करण्यात येणार
आहे.
डॉ. अनिल ठाकरे यांनी रोपांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल
राखणे आणि प्रदुषण कमी करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोपाच्या लागवडीसोबतच रोपे
संवर्धन करण्याची नितांत गरज आल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. अजंली गहरवार,
डॉ. गोपाल ठाकरे, प्रा. दिगांबर उंद्रटवाड, प्रा. निलीमा पाटील, मंजिरी भोयर, पंकज
जैन यांनी सहकार्य केले.
00000

Comments
Post a Comment