प्रधानमंत्री पिक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत पुन्हा मुदतवाढ
यवतमाळ, दि. 4 : खरीप हंगाम 2016 मध्ये  प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची  अंतिम मुदत आता 10 ऑगस्ट करण्यात आली आहे.
या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत 31 जुलै होती, ती वाढवून दि. 2 ऑगस्ट करण्यारत आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषि, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाशिव खोत यांचे प्रयत्न आणि केंद्र शासानाकडे  केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवून ती दि. 10 ऑगस्ट केली आहे.
शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पिक योजनेत जास्तीत जास्त  संख्येने सहभागी व्हावे, त्यासाठी नजिकच्या बॅंकेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकरी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती