यवतमाळ तहसिल कार्यालयात
महसूल दिन
* महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
यवतमाळ, दि. 3 : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या
महाराजस्व अभियान उपक्रमाची सुरुवात यवतमाळ तससिलमध्ये 1 ऑगस्टपासून शेतकरी आणि महिलांना
केंद्रबिंदू ठरवून करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य
साधून तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयाच्या सभागृहात महिला
कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासी नायब तहसिलदार व्ही. व्ही. वासनिक,
अव्वल कारकुन यू. डी. रेकवार, कनिष्ठ लिपिक निरू जाधव, रुपाली इंगळे, अर्चना अलोणे,
तलाठी दिपाली आंबेकर, तलाठी भावना लोखंडे, मिना वाघमारे या महिला कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट
कार्य केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तहसिलदार श्री. शेजाळ यांनी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान
महिला सक्षमीकरण महसूल आठवडा राबविण्याचे निर्देश देऊन या उपक्रमांतर्गत त्रस्त कुटुंब
आणि अडचणीतील महिलांना विनामुल्य सातबारा वितरण, निराधार वृद्ध, विधवा, परितकत्या महिलांना
सामाजिक सहाय्यता योजनेंतर्गत लाभ देणे, महिला शेतकऱ्यांचे फेरफार निकाली काढणे, शिबिरे
आयोजित करून शालेय विद्यार्थिनींना जातीचे प्रमाणपत्र तयार करून वितरीत करण्याबाबत
मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नायब तहसिलदार आर. व्ही. वेटे, एन. एस. थोटे, ए. टी.
भगत यांनी मार्गदर्शन केले.
000000

Comments
Post a Comment