गोकुळाष्टमीनिमित्त मद्यविक्री बंद
यवतमाळ दि.24:जिल्ह्यात गुरूवारी, दि. 25 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यादृष्टीने जिल्हाधिकारी यांनी मुंबई मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 142 (1) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व किरकोळ आणि घाऊक मद्य अनुज्ञत्या मद्यविक्रीकरीता दि. 25 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गोकुळाष्टमीनिमित्त मद्यविक्री बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्यविक्रीसाठी सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती आणि अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित