माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षांबाबतबुधवारी संयुक्त सभा
            यवतमाळ, दि.24 :माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी, मार्च 2017 च्या परीक्षेबाबत सर्व मान्यता प्राप्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची संयुक्त सहविचार सभा बुधवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नंदूरकर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
            या सभेस विभागीय मंडळाच्या परीक्षा कामकाजाच्या संदर्भात ऑनलाईन आवेदन पत्राबाबत सुचना, मार्गदर्शन करणे, गैरमार्गाशी लढा, खासगी विद्यार्थी योजना, पुन:र्रचित अभ्यासक्रम नववी ते बारावी मुल्यामापन योजना, केंद्रसंचालक, परीक्षक आणि नियामक तसेच शिक्षण विभागाचे इतर विषयाबाबतचे मार्गदर्शन विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, विभागीय सहाय्यक, सचिव यांचेकडून करण्यात येत आहे. या सभेसाठी सर्व मान्यताप्राप्त विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती