जंतनाशक मोहिमेच्या तारखेत बदल
यवतमाळ, दि. 31 : राष्ट्रीय जंतनाशक मोहिम दि. 2 आणि 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार होती, मात्र या कालावधीत सण येत असल्यामुहे ही मोहिम 7 आणि 20 सप्टेंबर रोजी राबविण्यात येणार आहे.
दि. 2 आणि 7 सप्टेंबर दरम्यान पोळा, गौरी, गणपती आदी सणांच्या सुट्ट्या येत असल्यामुळे या मोहिमेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दि. 7 आणि 20 सप्टेंबर रोजी 1 ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी, शाळा आणि शाळाबाह्य मुलांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात येणार आहे. याची नोंद नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित