राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या प्रक्रियेस प्रारंभ
यवतमाळ, दि. 8 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध राज्यस्तरीय शिष्यवृती परीक्षा रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून 31 ऑगस्टपर्यं आवेदनपत्र भरावे लागतील.
या परीक्षेस शासनमान्य शाळा, अनुदानित, खासगी अनुदानित, कायम विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, मराठी माध्यमांच्या शाळा, तसेच इतर सर्व माध्यमाच्या शाळांतील दहावीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतील. परीक्षेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी एका विद्यार्थ्यासाठी 120 रूपये प्रत्येकी आणि शाळा संलग्न फी 100 रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क एसबीआयचे चलान डाऊनलोड करून ते आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या नावे भरावे लागेल.
परिक्षेसाठी ॲग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ (केंद्र कोड 6501), विवेकानंद हायस्कूल, यवतमाळ (6502), श्री शिवाजी विद्यालय, पुसद (6503), एसपीएम हायस्कूल, वणी (6504), दिनबाई विद्यालय, दिग्रस (6505) ही परीक्षा केंद्र राहणार आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन प्रक्रिया www.mscepune.in या संकेतस्थळावर 3 ऑगष्ट पासून सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा केंद्रावरून परीक्षा देऊ इच्छिता त्या केंद्राचा संकेत क्रमांकाचा शाळेचा शिक्का आवेदन पत्रावर असणे आवश्यक आहे. ऑनलाईन भरलेले अर्ज विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी आणि शिक्का तसेच आवश्यक कागदपत्रांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा विज्ञान पर्यवेश्क्षक यांच्याकडे सादर करावे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती