यवतमाळ नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीत गुमास्ता कायदा लागू
यवतमाळ, दि. 4 : शासनाच्या आदेशानुसार यवतमाळ नगर परिषद क्षेत्राची हद्दवाढ झालेली असून त्यात डोळंबा, भोसा, वडगाव रोड, वाघापूर, मोहा, उमरसरा, पिंपळगाव आणि एमआयडीसी वगळून लोहाराचा समावेश झाला झाला आहे. या सर्व भागात गुमास्ता कायदा लागू करण्यात आला आहे.
 येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने घोषित केलेले क्षेत्र वगळून या गावाच्या महसूली हद्दीतील संपूर्ण क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व व्यवसायिकांना दि. 22 जानेवारी 2016 पासून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 (गुमास्ता कायदा) या कायद्याच्या तरतुदी लागू झाल्या आहे. त्यानुसार व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
    या क्षेत्रातील सर्व व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज सादर करावे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता राज्य शासनाची apalesarkar.maharashtra.gov.in किंवा mahakamgar.gov.in या संकेतस्थळांचा उपयोग करावा, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती