हुंडा प्रतिबंधक जिल्हा सल्लागार मंडळासाठी नामनिर्देशन आमंत्रित
यवतमाळ, दि. 8 : हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार जिल्हास्तरावरील हुंडा प्रतिबंधक जिल्हा सल्लागार मंडळासाठी नामनिर्देशने मागविण्यात आले आहे. यासाठी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात नामांकने सादर करावी लागणार आहे.
हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार मंडळ गठीत करण्यासाठी नामनिर्दशने मागविण्यात आले आहेत. जिल्हा सल्लागार मंडळाच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासाठी अहर्ता विहित करण्यात आली आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 च्या अधिनियमांतर्गत कलम 8 ब (4) च्या तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यातील गठीत करावयाच्या सल्लागार मंडळातील सदस्य म्हणून एखाद्या व्यक्तीचे नामनिर्देशन, ज्यांच्या ठायी क्षमता, सचोटी आणि प्रतिष्ठा असेल आणि ज्यांना महिलांच्या शोषणासंबंधीच्या समस्या सोडविण्याबाबत पुरेसे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच नामनिर्देशनासाठी 35 ते 65 वर्षादरम्यान वय असावे. यात हुंडा प्रतिबधक अधिनियम, महिलांच्या या शोषणासंबधीच्या समस्या सोडविणे, महिलांसंबंधी किमान तीन वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना नामनिर्देशनात पसंती देण्यात येणार आहे.
नामनिर्देशन करीत असलेली व्यक्ती ही त्या जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन सादर करण्याचा विहित नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती