जागतिक कर्करोग
दिनानिमित्त मौखिक तपासणी, औषध वाटप
यवतमाळ, दि. 2 : जागतिक कर्करोग विरोधी दिनानिमित्त पांढरकवडा
येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. रुग्णालयातील
बाह्यरुग्ण विभागात दंतचिकित्सकांमार्फत मौखिक तपासणी करून औषधांचेही वाटप करण्यात
आले.
यावेळी डॉ. इकबाल यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे
होणाऱ्या रोगांविषयी माहिती दिली. तसेच रुग्णांना चित्रफितीच्या सहाय्याने तंबाखू सेवनामुळे
होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक
मोहित पोहेकर यांनी रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवानामुळे मानवी आरोग्यावर होणारे
परिणाम आणि त्यामुळे होणारे मुखरोग, कर्करोगाविषयी माहिती दिली. यावेळी काही रुग्णांनी
तंबाखू व्यसनापासून मुक्त होण्याचा संकल्प घेतला. राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे
सागर परोपटे यांनी रुग्णांना कर्करोगाची माहिती देऊन मौखिक तपासणी करण्याबाबत माहिती
दिली.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्ह्यात कर्करोग विरोधी सप्ताह
राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख आणि जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर घेण्यात आले. शिबीरात उपजिल्हा
रुग्णालयाचे दंतचिकित्सक डॉ. इकबाल यांनी तपासणी केली. पांढरकवडा परिसरातील रुग्णांनी
मोठ्या प्रमाणात मौखिक तपासणी शिबीराचा लाभ घेतला. शिबीरासाठी संगणक प्रचालक अंजली
रिठे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडले, वैद्यकीय अधिकरी डॉ. सत्तुरवार यांनी पुढाकार घेतला.
0000

Comments
Post a Comment