13 ऑगस्ट रोजी बालचित्रकला स्पर्धा
यवतमाळ, दि. 3 : मुंबई येथील चित्रकला व शिल्प यांच्यातर्फे दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी ही परिक्षा दि. 13 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 18 परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ, शिवाजी विद्यालय, यवतमाळ, शिवशक्ती विद्यालय, कळंब, प्रताप विद्यालय, बाभुळगाव, लोकनायक बापुजी अणे विद्यालय, यवतमाळ, एडेड हायस्कुल (मुली), दारव्हा, दी न्यू इंग्लिश हायस्कुल, नेर, राष्ट्रीय विद्यालय, दिग्रस, शिवाजी विद्यालय, पुसद, जि. प. माध्यमिक शाळा, महागाव, जि. प. परिषद माध्यमिक कन्या शाळा, उमरखेड, जि. प. हायस्कुल, पांढरकवडा, समर्थ विद्यालय, वणी, जनता विद्यालय, घाटंजी, जनता विद्यालय, वणी, आदर्श विद्यालय, मारेगाव, श्री. म. द. भारती विद्यालय, आर्णी, नेताजी हायस्कुल, राळेगाव या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा 16 वर्ष पूर्ण वयोपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खुली राहील. ही स्पर्धा गट क्र. 1, वय 7  वर्षापर्यंत, गट क्र. 2-7 ते 9 वर्षापर्यंत गट क्र. 3-9 ते 12 वर्षापर्यंत व गट क्र. 4-11 ते 16 वर्षापर्यंत एकूण चार गटात राहील. या बालचित्रकला स्पर्धेच्या प्रवेशासाठी 5 रुपये शुल्क आकारण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या साहित्यासह परीक्षा केंद्रावर हजर रहावे. ही परीक्षा दोन तासाची असून परीक्षेची वेळ 12 ते 2 अशी राहील. पहिला व दुसऱ्या गटातील प्रत्येकी 100 ते 60 रुपये याप्रमाणे बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल. तिसऱ्या व चौथ्या गटातील प्रत्येकी 40 व 20 रुपये याप्रमाणे बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल. जिल्हास्तरावर तालुका पातळीवरुन प्राप्त झालेल्या गटाच्या चित्रकामापैकी जास्तीत जास्त गुणवत्ता असलेली प्रत्येकी 15 असे 4 गटातील 60 चित्रकामे निवडले जातील. प्रत्येकी गटातील 10 बक्षिस विजेत्या खेरीज 5 स्पर्धकांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वरील जवळच्या परीक्षा केंद्रावर नाव नोंदणी करून बालचित्रकला स्पर्धा परिक्षांना बसवावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आणि विस्तार अधिकारी राजू मडावी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती