शेतकऱ्यांनी पिकांवरील
किडीचे व्यवस्थापन करावे
*कृषी विभागाचे
आवाहन
यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यामध्ये खरीप 2016 मध्ये कापूस, सोयाबीन
आणि ज्वारी या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. सद्या जिल्ह्यामध्ये पावसाचे
प्रमाण चांगले असल्यामुळे पिक परिस्थिती समाधानकारक आहे. पिक वाढीच्या अवस्थेत असल्यामुळे
पिकावरील विविध प्रकारची किड आणि रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचे
नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे
करणे गरजेचे आहे.
बीटी कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा
तुडतुडे आणि फुलकिडे या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर
मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो. त्यापासून किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी
पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. वेळेवर आंतरमशागत करून पिक तणविरहीत ठेवावे.
रसशोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रासोपा,
ॲनॅसयीस प्रजातीचा परोपजिवी किडक यांची संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किडकनाशकांचा
वापर टाळावा. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5
टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझाडीरेक्टीन 0.3 टक्के निंबोळी तेल आधारीत
डब्लूएसपी 30 मिली किंवा ॲझाडीरेक्टीन 5 टक्के, 10 मिली वापरावे. किडीचा प्रादुर्भाव
आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. जसे. ब्रुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही, 10 मिली, डायफेंथ्युरॉन
50 टक्के पा.मि. भुकटी, क्लोरपायरीफॉस 50 टक्के अधिक सायफरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली.
सोयाबिन पिकावरील चक्रीभुंगा किडीच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीनवरील
चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. या किडीचे व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार
प्रोफेनाफॉस 10 टक्के प्रवाही, 20 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्रोल किंवा इथेयॉन किंवा
थयक्लोप्रिड किंवा ट्रायझोफॉस यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. ही फवारणी पॉवर स्प्रेअरने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकांची मात्रा
तिप्पट करावी.
ज्वारीवर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या
खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी किडीचे माशी फिक्कट पिवळसर असते. आकाराने घरातल्या माशीपेक्षा
लहान असते. अळी झाडात शिरून आतील गाभा पोखरून टाकते. त्यामुळे झाड सुकून जाते. त्यास
मर असे म्हणतात. त्यामुळे खोडमाशीचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पिकावर
वेळीच क्विनॉलफॉस किंवा मिथील डेमेटॉन पाण्यात मिसळून फवारणी करावी. याप्रमाणे पिक
व्यवस्थापन केल्यास रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी
याप्रमाणे वेळीच नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment