जलयुक्तच्या
बंधाऱ्याने टेंभुरदरा शिवार झाले जलमय
*
शिवारातील बंधाऱ्याचे खोली व रुंदीकरण
* शिवारात
रब्बीचे क्षेत्र वाढणार
*
शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकाकडे कल
यवतमाळ, दि. 6 : पिण्याच्या पाण्यासह शेतीला सिंचनाची सुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत
आहे. या अभियानांतर्गत उमरखेड तालुक्यातील टेंभुरदरा शिवारात साखळी सिमेंटनाला
बांधाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने संपूर्ण शिवार जलमय झाला असून रब्बी
पिकांसाठी बंधाऱ्यातील संरक्षित पाण्याचा फायदा होणार असल्याचे मत परिसरातील
शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
उमरखेड तालुक्यातील टेंभुरदरा या गावाची लोकसंख्या 2428 इतकी
असून गावाचे भौगोलिक क्षेत्र 1665.92 इतकी आहे. गावाच्या शिवारातील नाल्यावर जुने
सिमेंटनाला बंधारे आहे. हे साखळी बंधारे अरूंद असण्यासोबतच गाळाने भरले असल्याने
फारसे पाणी या बंधाऱ्यात साचत नव्हते त्यामुळे पाणी अडवून जमीनीत मुरविण्याचे
उदि्दष्ठ साध्य होत नव्हते. जलयुक्त शिवार अभियानातून या बंधाऱ्यातील गाळ
काढण्यासोबतच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम कृषी विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले
होते.
सर्व बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने या वर्षी
झालेल्या दमदार पावसात सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे
परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्याने
शेतकऱ्यांना केवळ खरीप पिकेच घेता येत
होती. या बंधाऱ्यांमुळे मात्र रब्बीचे क्षेत्र वाढणार असून परिसरातील शेतकरी
कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी यासारख्या भाजीपाला क्षेत्राकडेही वळणार आहे.
शिवारातील साहेबराव दत्ता जाधव या शेतकऱ्यांकडे 4 हेक्टर इतकी
जमीन आहे. परंपरेप्रमाणे ते कापूस आणि सोयाबिन पिकाचे उत्पादन घेतात. बंधाऱ्यामुळे
विहीरींची पाणी पातळी वाढली असून पारंपारिक पिकासोबत आता उन्हाळी पिकेही घेता येणे
शक्य असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही एकच पिक घ्यायचो, दुसऱ्या
पिकास पुरेशे पाणी उपलब्ध होत नव्हते. यावर्षी मात्र उन्हाळ्यात भुईमुंग पिक घेणार
असल्याचे त्यांनी सांगितले. उमरखेड तालुक्यात तहसिलदार भगवान कांबळे यांच्या
प्रयत्नातून ठिकठिकाणी जलयुक्तची अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून त्याचा
शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
000000000


Comments
Post a Comment