अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुलशाळांसाठी अनुदान योजना
यवतमाळ, दि. 6 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभुत सोई-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शाळांनी दिनांक 8 ऑगस्टपर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभुत सुविधांसाठी कमाल 2 लक्ष पर्यंत अनुदान देण्यात येते. मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारसी व जु या अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांची किमान 70 टक्के विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना सदर अनुदान दिल्या जाते. तसेच मान्यताप्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. अनुदान योजनेबाबतची अधिक माहिती https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छुक शाळा, संस्थांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक 8 ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित