31 ऑगस्टपर्यंत मतदार
याद्यांची शुद्धीकरण
यवतमाळ, दि. 3 : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार
राष्ट्रीय मतदारयाद्या शुद्धीकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दि.
31 ऑगस्ट पर्यंत मतदान केंद्राच्या ठिकाणी नमुना 6, 7, 8 व 8 अ स्विकारण्यात येणार
आहे.
राज्य निवडणूक आयोगामार्फत नोव्हेंबर 2016 ते जानेवारी
2017 या कालावधीत नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीकरीता
31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची नावे मतदारयादीमध्ये घेतल्या जाणार
आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीकरीता मतदारांनी नोंदणी करावी यासाठी दि. 7 ते 21 ऑगस्ट
दरम्यान नगरपालिका स्तरावरील मतदान केंद्राच्या ठिकाणी दावे आणि हरकती स्विकारण्यासाठी
विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दि. 1 जानेवारी 2016 रोजी 18 वर्षे वय पुर्ण
झालेल्या नागरिकांनी नावाची नोंदणी करावी, तसेच मतदारयादीतील नोंदीमध्ये चुका असल्यास
मतदारांनी नमुना 8 भरुन त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी
कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment