देशी दारूच्या किरकोळ विक्रीची तीन दुकाने निलंबित
* जादा दराने दारू विक्रीप्रकरणी
कार्यवाही
* आणखी काही दुकाने कार्यवाहीच्या
टप्प्यात
यवतमाळ, दि. 3 : कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीसाठी उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने
कमाल विक्रीची किंमत निश्चित करून देण्यात आली आहे. असे असतांना काही दुकाने जादा दराने
विक्री करीत असते. अशा दुकानांवर कार्यवाहीचा सपाटा उत्पादन शुल्क विभागाने लावला आहे.
त्यानुसार देशी दारूच्या किरकोळ विक्रीच्या तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात
आली आहे.
दारूची विक्री करतांना एमआरपी दरानेच करावी लागते.
परंतु अनेक ठिकाणी जादा रक्कम आकारली जाते. अशी रक्कम आकारने मुंबई दारूबंदी कायदा
1949 चे उल्लंघन आहे. जादा दराच्या विक्रीबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या
होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे
जादा दर आकारणाऱ्यावर कार्यवाहीची मोहिम घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन देशी दारू
किरकोळ विक्रीच्या दुकानांवर एक महिन्यासाठी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.
कार्यवाही करण्यात आलेल्या दुकानांमध्ये मारेगाव येथील
टी.एन.बदकी, झरी तालुक्यातील सतपल्ली येथील एस.एस.शर्मा तसेच महागाव तालुक्यातील राधेलाल
गणुलाल जयस्वाल यांच्या देशी किरकोळ विक्रीच्या सीएल-3 या मद्यविक्री परवान्याच समावेश
आहे. एमआरपी नियमभंग प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 54 (1) (c) नुसार
कार्यवाही करण्यात आली आहे.
जास्त दरात दारू विक्री प्रकरणी विशेष मोहिम राबविण्यात
येत असून आणखी काही दुकानांवर कार्यवाही होत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने
कळविण्यात आले असून दुकानांनी विहीत दराने मद्य विक्री करावे, जादा दराची विक्री आढळून
आल्यास जास्त कालावधीसाठी निलंबनाची कार्यवाही केली जातील, असे उत्पादन शुल्कच्यावतीने
कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment