कुराश, जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धाच्या तारखेत बदल
यवतमाळ, दि.24 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालयतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कुराश व जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दिनांक 29 आणि 30 ऑगस्ट या दिवशी निश्चित करण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तर कुराश या क्रीडा स्पर्धा दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट या दिवशी बि.बि.आर्ट कॉलेज, दिग्रस येथे तसेच जिल्हास्तर जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट 2016 या दिवशी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे करण्यात येत आहे.  त्यानुसार सर्व स्पर्धक/खेळाडू तसेच विद्यालय व महाविद्यालय यांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित