शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात 49 जणांची निवड
            यवतमाळ, दि. 12 : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा यवतमाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात 49 जणांनी निवड करण्यात आली.
            औरंगाबाद येथील वॅरॅक प्रायव्हेट लिमीटेड, ड्युरो व्हॉल्व्स इंडिया प्रायव्हेट लिमीटेड आदी कंपन्यांनी शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात सहभागी होऊन 86 पैकी 49 प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली. या मेळाव्याच्या आयोजनासाठी प्राचार्य अनिल रेड्डीवार, श्रीमती ए. एस. आगरकर, श्री. पोटे, दिलीप अंबाडारे, ओ. डब्ल्यू राठोड, फुल्लुके यांनी पुढाकार घेतला.
00000


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित