आर्थिक
दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा
यवतमाळ, दि. 8 : आर्थिक दुर्बल घटकांतील आठवीमध्ये शिकत
असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
शिष्यवृत्ती योजना सन 2016-17ची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर
रोजी घेण्यात येणार असून 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.
ही परीक्षा जिल्ह्यातील आठ केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी
अभ्यंकर कन्या शाळा, यवतमाळ, (केंद्र कोड 6501), श्री शिवाजी विद्यालय, यवतमाळ
(6502), कोषटवार दौलतखान विद्यालय, पुसद (6503), जनता हायस्कूल, वणी, (6504),
विवेकानंद विद्यालय, वणी (6505), मोहनाबाई कन्या शाळा, दिग्रस (6506), साकळे
विद्यालय, उमरखेड (6507), समर्थ विद्यालय, घाटंजी (6508) हे केंद्र आहेत.
परीक्षेसाठी 100 रूपये शुल्क आणि संस्था संलग्नता शुल्क 200 रूपये राहणार आहे. पालकांचे
उत्पन्न दिड लाखापेक्षा कमी असावे, सातवीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असावे
लागणार आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन प्रक्रिया www.mscepune.in या संकेतस्थळावर 3
ऑगष्ट पासून सुरु झाली आहे. आवश्यक कागदपत्रांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या
कार्यालयात जिल्हा विज्ञान पर्यवेश्क्षक यांच्याकडे सादर करावे, असे माध्यमिक
शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment