यवतमाळ नगरपरिषदेचा पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
यवतमाळ, दि. 4 : राज्य
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 ई च्या रिक्त पदासाठी जिल्हाधिकारी यांनी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित
केला आहे. या कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
दिनांक 4 ते 11 ऑगस्टपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. दरम्यानच्या सुट्टीच्या
दिवशी मात्र नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाहीत, तसेच ते स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार दिनांक
12 ऑगस्ट रोजी सकाळी
11 वाजता करण्यात येणार आहे. छाननी नंतर नामनिर्देशन पत्र 18ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत
मागे घेता येईल. रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येईल तर सोमवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी
मतमोजणी होईल. ही पोटनिवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती
केली आहे.
00000
Comments
Post a Comment