जिल्ह्यात ‘आजादी 70, याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ, दि.16 : नेहरू युवा केंद्र यवतमाळ, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारतर्फे स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 9 ते 23 ऑगस्ट दरम्यान ‘आजादी 70, याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
केंद्राद्वारे तालुकास्तरावर राष्ट्रीय युवा कॉरप्स यांच्या माध्यमाने नेहरू युवा केंद्रासोबत सलग्नीत असलेल्या युवा मंडळाद्वारे गावा गावात विविध स्पर्धा जसे राष्ट्रभक्तीपर भाषण, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, युवा संगोष्ठी, चित्रकला प्रदर्शनी स्वच्छता अभियान या प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभर करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याच्या पूर्व संधेला वडगाव यवतमाळ येथे यवतमाळ कॅरीअर अकॅडमी आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने दि. 14ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता कँडल लाईट फ्रीडम मार्च आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एस. जी. राणे, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटेट मौन पाळून देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गावातून कॅंडल मार्च काढण्यात आला.
यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रासोबत संलग्नित असलेल्या युवा मंडळ, महिला मंडळ यांच्याद्वारा नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा कॉरप्स्, युवा मंडळाचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम गावोगावी राबविण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित