शनिवारी केबल ऑपरेटर निवडीसाठी सोडत
यवतमाळ,
दि. 4 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या
संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड शनिवारी, दि. 6 ऑगस्ट रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह
क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात
येणार आहे.
प्रत्येक
महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा
परिचालकाची निवड करण्यात येणार आहे.
सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित
रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment