जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल
यवतमाळ, दि. 8 : क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
पूर्वीच्या नियोजनानुसार 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा घेण्यात येणार होत्या. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी सकाळी 9 वाजता आझाद मैदानातील जलतरण तलाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित