शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची अंतिम मुदत

यवतमाळ, दि.6 (जिमाका) : राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम या योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ योजना अंतर्गत वसतीगृह प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात वेळोवेळी बदल करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. जिल्ह्यांमध्ये वसतिगृहातील जागा रिक्त आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह येथे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गातील ५, विमाप्र प्रवर्गातील ३, दिव्यांग प्रवर्गातील ३ व अनाथ प्रवर्गातील १ अशा एकूण १२ जागा रिक्त आहेत. तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इमाव प्रवर्गातील ४, दिव्यांग प्रवर्गातील १, अनाथ प्रवर्गातील १ व आर्थिक मागास प्रवर्गातील १ अशा एकूण ७ जागा रिक्त आहेत. मुलींच्या शासकीय वसतिगृहात, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इमाव प्रवर्गातील १, विजाभज प्रवर्गातील ३, विमाप्र प्रवर्गातील २, दिव्यांग प्रवर्गातील २, अनाथ प्रवर्गातील १ व आर्थिक मागास प्रवर्गातील १ अशा एकूण १० जागा रिक्त आहेत. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विजाभज प्रवर्गातील १, विमाप्र प्रवर्गातील १, दिव्यांग प्रवर्गातील १, अनाथ प्रवर्गातील १ व आर्थिक मागास प्रवर्गातील १ अशा एकूण ५ जागा रिक्त आहेत. वसतिगृहांमध्ये निवड यादीनुसार प्रवेश देऊनही जागा रिक्त असल्याने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावा. सदर योजनांसाठी अर्ज करण्याचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत राहील. योजनेच्या अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इतर मागास बहुजन कल्याणच्या सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस