27 फेब्रुवारीपासून नवीन मोटार सायकलची सिरीज
यवतमाळ, दि. 26 :(जिमाका) : परिवहनेत्तर विभागातील नवीन मोटार सायकलची सध्याची एमएच 29 सीएन सिरीज संपुष्टात येत असल्यामुळे एमएच 29 सीक्यु ही नवीन सिरीज 27 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.
ज्या ग्राहकांना नवीन आकर्षक नंबर घ्यायचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त एका दिवसासाठी उपलब्ध राहील, त्यानंतर ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल, यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे
Comments
Post a Comment